#

Advertisement

Monday, November 3, 2025, November 03, 2025 WIB
Last Updated 2025-11-03T17:54:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

लाडक्या बहि‍णींसाठी : खात्यात पैसे जमा होणार

Advertisement

मुंबई : लाडक्या बहि‍णींसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहि‍णींच्या खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे. तसेच लाडक्या बहि‍णींच्या केवायसीबद्दलही तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून वितरित होण्यात सुरुवात होणार आहे. याबाबत माहिती देताना आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अशी विनंती महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.