#

Advertisement

Monday, November 3, 2025, November 03, 2025 WIB
Last Updated 2025-11-03T17:49:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माझी लाय डिटेक्टर टेस्ट करा ! निंबाळकर यांना अश्रू अनावर

Advertisement

फलटण : येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वादात सापडले आहेत. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाशी त्यांचे नाव जोडले जात आहे. आता याच आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी रणजितंसिंह नाईक निंबाळकर पुढे आले आहेत. त्यांनी माझ्यासकट सर्वांचीच लाय डिटेक्टर टेस्ट करा, असे खुले आव्हान देत डॉक्टर महिला प्रकरणाशी माझा संबंध नाही, असा दावा केला आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान, रणजितसिंह निंबाळकर यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर दुग्धाभिषेक केला. यावेळी निंबाळकर यांना अश्रू अनावर झाले. ते ढसाढसा रडले. हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. निंबाळकर यांनी डॉक्टर महिला प्रकरणातील सर्व आरोप फेटाळले आहेत.
रणजितसिंह निंबाळकर यांनी 3 नोव्हेंबर रोजी फलटण येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी अनेक व्हिडीओ, फोटो आणि संभाषणं दाखवली. सोबतच पत्रकार परिषदेच्या अगोदर त्यांनी एक मिनिट उभे राहून मृत डॉक्टर महिलेला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर बोलताना निंबाळकर यांनी सुषमा अंधारे यांची माफी मागितली. तसेच, डॉक्टर महिला प्रकरण तसेच माझ्यावरच्या इतर सर्व आरोपांचे मास्टरमाईंड हे रामराजे निंबाळकर हेच आहेत, असाही खळबळजनक दावा त्यांनी केला. पुढे बोलताना ‘शेर को धमका सकते है डरा नही सकते’ असे म्हणत रामराजे निंबाळकरांना आव्हानच दिले. तुमच्या कर्तृताचा पाढा वाचायचं तर वेगळी सभा घ्यावी लागेल, अशी बोचरी टीकाही राणजितसिंह निंबाळकर यांनी केली.