#

Advertisement

Saturday, November 8, 2025, November 08, 2025 WIB
Last Updated 2025-11-08T13:17:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जरांगेंच्या मर्डरचा प्लॅन, आरोपीची पत्नी आली समोर

Advertisement

बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा प्लॅन करण्यात आला होता. या संपूर्ण घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यात दोन जणांना अटकही करण्यात आली आहे. त्यातील एक आरोपी हा बीड जिल्ह्यातील गेवराईचा अमोल खुणे आहे.
अमोल खुणे याला अटक केल्यानंतर त्याची पत्नी आता समोर आली आहे. त्यांनी या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यात त्यांनी आपला पतीन निर्दोष असल्याचं सांगितलं आहे. शिवाय आपला पती हा मनोज जरांगे पाटील यांचा खंदा समर्थक आहे. त्यांचे पानही त्यांच्या शिवाय हलत नव्हतं. पहिल्या पासून त्यांनी जरांगेंना साथ दिली. जरांगेंना कुणी काही बोललं तर ते त्यांना हटकत असत. जरांगे पाटीलांना काही बोलू नका असे ही ते सांगत. पण आपल्या पतीला दारू पिण्याचे व्यसन होते. ते अलीकडच्या काळात वाढले होते.
माझ्या पतीला या प्रकरणात फसवले गेले आहे. गेल्या एक महिन्यापासून त्यांना कुणी तरी सतत दारू पाजत होते. ते घरी ही उशिरा येत होते. नेहमी ते दारूच्या नशेत असत. दारूच्या नशेत त्यांच्याकडून हे सर्व करून घेण्याचा प्लॅन असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय दारूच्या नशेत आपला पती काही तरी बोलून गेला असेल असं ही त्या म्हणाल्या आहेत. दारू प्यालल्या मुळे त्यांचा एखादा शब्द चुकला असेल असं ही त्या म्हणाल्या. दारू पाजून त्यांच्याकडून हे बोलून घेतलं आहे असा दावा ही त्यांनी केला. आपला पती निर्दोष आहे. त्यांना यात अडकवलं जात आहे असं ही त्या म्हणाल्या.  पण त्यांना दारू पाजणारे ते किंवा तो कोण होता हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. 


दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून या मागे धनंजय मुंडे असल्याचा आरोप केला होता. तर मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यात आता आरोपीची पत्नी समोर येवून त्यांच्या वक्तव्याने या प्रकरणात नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.