Advertisement
मुंबई : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकांचा कार्यक्रम सध्या जाहीर होणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने कोर्टात दिली आहे. तर आरक्षण प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्याची तयारी असल्याचे देखील कोर्टाने स्पष्ट केले. निवडणुका वेळेत होणेही सर्वात महत्त्वाचे असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे पुढील सर्व निवडणुका पुढील वर्षात म्हणजेच जानेवारी २०२६ नंतरच जाहीर होतील, अशी सध्याची तरी चिन्हे आहेत.
राज्यात नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदानासाठी काही दिवसच राहिले आहेत. तर, दुसरीकडे पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाले आहे. तर, काही दिवसात निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. डिसेंबर महिन्याच्या मध्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जानेवारीत महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची चर्चा सुरू होती. मात्र, राजकीय आरक्षण मुद्द्यावर निवणूक पुन्हा पुढे ढकलली जाणार आहे.
