#

Advertisement

Friday, November 14, 2025, November 14, 2025 WIB
Last Updated 2025-11-14T11:44:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नितीश कुमार यांचा विजय हे मान्य करावं लागेल : खासदार सुप्रिया सुळे

Advertisement

बिहारमधील निकालावर स्पष्ट प्रतिक्रिया

मुंबई : नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एकतर्फी, इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया, सर्व्हेंना किंवा जिंकणाऱ्यांनाही वाटत आहे. आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल, अशी स्पष्ट प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी बिहारमधील निकालावर व्यक्त केली. 
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुळे बोलत होत्या. बिहारच्या लोकांनी नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. हे यश नितीश कुमार यांचं आहे. पूर्ण निकाल अजून यायचा आहे. आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्हाला आता बघायला पाहिजे की आमच्याकडून कोणत्या चुका झाल्या. एकतर्फी निकाल लागेल असं वाटत नाही. मतविभाजन कसे झाले याचा अभ्यास 2 ते 3 दिवसात करु असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे. 
आपण आत्मचिंतन केले पाहिजे. निकालांनंतर त्याचा अभ्यास हा केलाच पाहिजे. मतविभाजनामुळे हा फटका बसला आहे का हे बघाव लागेल. या विषयी मी काँग्रेससोबत आणि तेजस्वींसोबत देखील चर्चा करेन. या निवडणुकीत स्टार प्रचारक आणि चेहरा नितीश कुमार होते. हे यश त्यांचे आहे.