#

Advertisement

Thursday, November 6, 2025, November 06, 2025 WIB
Last Updated 2025-11-06T13:13:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मी कधीही चुकीच्या कामांना पाठिंबा देत नाही !

Advertisement

पुणे : पार्थ पवार यांनी 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केली आहे. यासाठी मुद्रांक शुल्क केवळ 500 रुपये भरल्याचा दावाही दानवेंनी केला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्यासह अजित पवार आणि राज्य सरकारची चिंता वाढली आहे. या सर्व प्रकरणावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ⁠मी संविधानाला मानणारा माणूस आहे. मी कधीही चुकीच्या कामांना पाठिंबा देत नाही, असे पवारांनी म्हटले आहे. 
होणाऱ्या आरोपांवर बोलताना अजित पवारांनी म्हटले की, माझा या प्रकरणाशी दुरान्वये देखील संबंध नाही. अशा चुकीच्या गोष्टी कोणीही करू नये अशा सूचना दिल्या होत्या. याची सगळी माहिती घेतो आणि नंतर बोलेल. मी आजपर्यंत कधीही नातेवाईकांना फायदा व्हावा यासाठी एकही अधिकाऱ्याला फोन केला नाही. ⁠माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीच काही करत असेल तर माझा पाठिंबा नसेल.
अजित पवार म्हणाले की, मी कायद्याच्या चौकटी मध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. ⁠मुख्यमंत्र्ययांनी चौकशी जरूर करावी, तो त्यांचा अधिकार आहे. ⁠मी सगळी माहिती घेतो आणि उद्या तुम्हाला संध्याकाळी भेटेल. सर्व गोष्टी नियमात झाल्या पाहिजेत. तो पत्ता पार्थ यांच्या नावावर आहे, माझ्या नावावर नाही. ⁠मी आता बोल लो नसतो तर तुम्ही बोल का असता कुठेतरी पाणी मुरतंय. ⁠पण माझा कुठेही संबंध नाही. मुलं मोठी होतात ती त्यांचा व्यवसाय करतात. 

चौकशीसाठी समिती स्थापन
पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीला 1800 कोटी रूपयांची जमीन अवघ्या 300 कोटींना देण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी चौकशीचे आदेश दिले असून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीला सुरुवात होणार आहे.