Advertisement
पुणे : आद्य क्रांतिकारक वस्ताद लहूजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त संगमनगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे येथील स्मारकास भेट देऊन त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे साहेब आणि महिला प्रदेश उपाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी लहूजींच्या शौर्याला आणि कार्याला सलाम केला. तसेच, वस्ताद लहूजी साळवे यांचे कार्य हे देशभक्ती आणि सामाजिक समतेचा आदर्श आहे. वस्ताद लहूजी साळवे यांच्या तेजस्वी विचारांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी पक्षाचे व बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होत.
