#

Advertisement

Wednesday, November 5, 2025, November 05, 2025 WIB
Last Updated 2025-11-05T12:32:57Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महिला डॉक्टर बलात्कार प्रकरण : आरोपी पोलीस उपनिरीक्षक बडतर्फ

Advertisement

सातारा : जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांसारख्या महत्त्वाच्या नोकरीत राहून असे घृणास्पद काम करणाऱ्या व्यक्तीला सेवेत ठेवणे हे लोकांच्या हिताचे नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. म्हणूनच, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कायद्यातील अधिकार वापरून गोपाळ बदने याला कायमस्वरूपी पोलीस नोकरीतून काढून टाकण्याचा (बडतर्फ करण्याचा) आदेश दिला. या कारवाईमुळे, या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस खात्याशी असलेला संबंध पूर्णपणे संपला आहे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये एका 28 वर्षीय महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या महिला डॉक्टरचा मृतदेह तपासला असता, तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहिलेली आढळली. या नोटमध्ये तिने स्पष्टपणे सांगितले होते की, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच, प्रशांत बनकर नावाचा सॉफ्टवेअर इंजिनियर तिला मानसिक त्रास देत होता. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गोपाळ बदने याला अटक केली होती, जो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.