Advertisement
बीड : पालकमंत्री जालन्याची असले तरी मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार आहे. मी बीड जिल्ह्याची अजन्म पालक आहे, अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे. असंही यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे, मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं असून, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होण्याची मनातली इच्छा प्रगट केली आहे का? अस सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
सध्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे अजित पवार यांच्याकडे आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांनी एन निवडणुकीत असं व्यक्तव्य केल्यामुळे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत पंकजा मुंडे या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की बीड जिल्ह्याची मी संपर्क मंत्री आहे. बीड जिल्ह्याची मी पालक आहे. पालकमंत्री मी जालन्याची आहे. बीड जिल्ह्याची आजन्म पालक आहे. मंत्री म्हणून मी प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार आहे. अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे. नगराध्यक्षांना संरक्षण देणार आहे, असंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
