#

Advertisement

Friday, November 7, 2025, November 07, 2025 WIB
Last Updated 2025-11-07T18:16:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"शारदा सिद्धनाथ"चे बॉल बॅडमिंटन स्पर्धेत यश

Advertisement

मंगळवेढा : सोलापूर शासकीय मैदानात स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शारदा सिद्धनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगटांमध्ये मुलींचा सहभाग घेतला होता. यामध्ये या स्पर्धेमध्ये मुलींचा 14 वर्षे वयोगटांमध्ये क्रमांक आला तसेच 19 वर्षे वयोगटांमध्ये मुलांमध्ये या स्पर्धेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक आला तसेच 19 वर्षे वयोगट मुलामध्ये अटीतटीच्या सामन्यांमध्ये मुलीने बॉल बॅडमिंटन या स्पर्धेत बाजी मारली व प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले यांची निवड पुणे येथील सासवड या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून पाटखळ पंचक्रोशीतील मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस विद्यालयांमध्ये साजरा केला या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार पवार यांनी अनमोल मार्गदर्शन केले तसेच बाळकृष्ण मठाचे मठाधिपती लाड महाराज यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  क्रीडा शिक्षक युवराज घोडके यांचा सन्मान लाड महाराज यांनी गुलाब पुष्प देऊन केला. शारदा सिद्धनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन केले व शब्बासकीची थाप देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी भाऊसाहेब जावीर,रामचंद्र पडोळे,छत्रसाल माळी,सौ.वैशाली भोसले,दिगंबर शिंदे,संतोष पाटील,नवनाथ गेजगे,धुळा वाघमोडे, तानाजी गोडसे, समाधान इंगोले,हनुमंत गडदे,जगदीश बोळे,सदाशिव उन्हाळे,मासाळ सर भिवा पवार,बोराडे गुरुजी,आनंद कोळेकर,दिलीप(महाराज) सावंत या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत डांगे यांनी केले व संतोष गाढवे यांनी आभार मानले.