Advertisement
- बँक ऑफ इंडिया वर्धा लीड डिस्ट्रिक मॅनेजर यांना दिले निवेदन
- शेतकरी, विद्यार्थी, बचतगट, कर्मचारी, व्यापारी यांना लाभ
- बहुजन रयत समितीचे अध्यक्ष अजय डोंगरे यांचा पाठपुरावा
चानकी (कोपरा) : २१ गावाचा संपर्क असलेल्या दहेगाव गोसावीला राष्ट्रीयकृत बँक शाखा स्थापन करा, अशी मागणीचे तुळजापूर रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष रामकिशोर रामाजी शिंगनधुपे व बहुजन रयत समितीचे अध्यक्ष अजय डोंगरे यांनी अग्रेनी बँकिंग कार्यालय वर्धाचे लीड डिस्ट्रिक मॅनेजर चेतन शिरभाते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी खासदार अमर काळे यांनाही निवेदन देऊन दहेगाव गोसावीला राष्ट्रियकृत बँकेची गरज असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
दहेगाव गोसावीला जर राष्ट्रीयकृत बँक स्थापन झाल्यास या बँकेला आर्थिक लाभ प्राप्त होईलच याशिवाय या विभागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बचतगट, शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचारी, व्यापारी यांना आर्थिक व्यवहार करण्यास सुलभ होईल. यावेळी नऊ ग्रामपंचायत ठरावाची कॉपी सादर करण्यात आली. नऊ ग्रामपंचायत मिळून एकूण लोकसंख्या १४ हजार ५८० व २१ गावांचा समावेश दहेगाव गोसावीच्या संपर्कात येतो. त्यामुळे दहेगाव गोसावी गावात राष्ट्रीयकृत बँक स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. उलट आर्थिक लाभ होईल. सर्व व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, बचतगट व इतर सर्वांना भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगली सुविधा निर्माण होईल, अशा आशयाचे निवेदन लीड डिस्ट्रिक मॅनेजर यांना देण्यात आले.
या संदर्भात वर्धाचे लीड डिस्ट्रिक मॅनेजर चेतन शिरभाते यांनी तत्परतेने वरिष्ठांशी संपर्क साधून शाखा स्थापन करण्यास साकारात्मकता दर्शवली आहे.
लीड डिस्ट्रिक मॅनेजर चेतन शिरभाते यांनी माहिती दिली की, आपले काम मार्गी लागलेले असून दुसऱ्या नंबरवर आहे. लवकरच आरबीआय कडून मान्यता आल्याबरोबर आपल्या येथे राष्ट्रीयकृत बँक स्थापन करण्यात येईल. आमच्याकडूनचा प्रस्ताव आम्ही आरबीआयकडे पाठवला आहे, त्यांनी महत्त्वाच्या शंका निरसन केले, त्यांनी काही महत्त्वाचे कागदपत्र मागविळी, दहेगाव गोसावी पासून २१ गाव किती अंतरावर आहे तिथली एकूण लोकसंख्या व मतदानाची संख्या या कागदाची पूर्तता करायला सांगितलेली आहे, अशी माहिती देण्यात आली.
