Advertisement
जालना : जालन्यातील सभेत अजित पवार पोलीस आणि कार्यकर्त्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. परतूर येथे अजित पवारांची सभा होती. या सभेत व्यासपीठावरील पाठीमागच्या रांगेत बसलेले निवडणुकीतील उमेदवार उपस्थित लोकांना दिसत नसल्याने अजित पवारांनी व्यासपीठाच्या खाली पुढे कार्यकर्त्याना खुर्च्या टाकायला सांगितल्या. आणि व्यासपीठापुढे खुर्च्या टाकून उमेदवारांना खुर्च्यांवर बसायला सांगितलं. आधी पोलीस या ठिकाणी खुर्च्या टाकायला परवानगी देत नव्हते. त्यामुळे अजित पवार पोलिसांवर संतापले. मी तुम्हाला सांगतो असं म्हणत त्यांनी निवडणुकीतील उमेदवारांना व्यासपीठाच्या पुढे बसायला सांगितले. मला पोलिसांना सांगायचं आहे की, माझे जे उमेदवार आहेत त्यांच्या खूर्च्या येथे लावा आणि त्यांना येथे बसवा. मी सांगतो, चला खूर्च्या काढा. कुठे आहेत कार्यकर्ते? अरे काढ ना ते...खुर्च्या द्या ना एक एक...कळत नाही का? उमेवारांना येथे बसवा. इकडं लावा खूर्च्या...सर्व उमेदवारांनी येथे पुढे या. तुला कळत नाही का....खूर्च्या घ्या पटपट. उमेदवारांची याद कुठे आहे?", असं अजित पवारांना मंचावरुन खडसावलं.
