Advertisement
महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यास काँग्रेस आता सकारात्मक
मुंबई : मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता? महाविकास आघाडी म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजे, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेवेबाबत काँग्रेसने आपली भूमिका बदलत मनसेचे महाविकास आघाडीत स्वागत केले आहे.
महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र वडेट्टीवारांनी मात्र भाजप विरोधात मनसेला सोबत घेण्यास सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. त्यामुळे मनसेवरुन काँग्रेसमध्ये दोन प्रवाह असल्याचं समोर येत आहे. या पार्शवभूमीवर पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मनसेशी आमची विचारधारा जुळत नाही. मात्र भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं आहे. भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक असून मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.
शरद पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना फोन
शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला होता. मुंबई महानगरपालिका कशी लढायची यावर बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली होती. मुंबई महापालिका निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदील दिला होता. मात्र, शरद पवार काँग्रेस सोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी म्हणून नव्याने आणखी काही प्रयत्न करणार यावर स्पष्टता नव्हती.
