Advertisement
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती
मुंबई : लाडकी बहीण योजनेमुळे गरजू महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असताना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी धक्कादायक कबुली दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आला असून, सरकारची मोठी फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. अपात्र लाभार्थ्यांनी तब्बल 165 कोटी रुपये लाटल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. लेखी उत्तरात त्यांनी ही कबुली दिली आहे. याबाबत रितसर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 हजार 431 पुरुषांनी 25 कोटी आणि 77 हजार अपात्र महिलांनी 140 कोटी, तसंच 9526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी 14.50 कोटी रुपये लाटले आहेत. 12 ते 14 हजार महिलांनी आपल्या नावे बँक खातं नसल्याने पती किंवा नातेवाईकांच्या खात्याचा वापर कतर 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळवले आहे. वेगवेगळ्या विभागातील 8000 कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलं आहे.
या योजनेच्या सुरुवातीला विभागाकडे इतर योजनांच्या लाभार्थ्यांचा सर्वसमावेशक डेटा नव्हता. मात्र आता आयटी विभागाच्या मदतीने डेला एक्तर केला जात आहे, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या कोणी लाभ घेतला असल्यास त्यांच्याकडूनही पैशांची वसुली करून त्यांच्यावर रितसर कारवाई केली जाणार असल्याचेही आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे.
