Advertisement
हवामान विभागाकडून 13 जिल्ह्यांसाठी दक्षतेचा इशारा
नागपूर : हवामान विभागानं पुढील दोन दिवसांसाठी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला थंडीचा यलो अलर्ट जारी केला असून, त्यामुळं सामान्य जनजीवनावरसुद्धा आता या कडाक्याच्या थंडीचा परिणाम होता आहे.
विदर्भात थंडीची तीव्रता वाढली असून उघड्यावर झोपणाऱ्यांना बेघर नागरिकांचा या थंडीच्या माऱ्यामुळं मृत्यू ओढावल्याची शंका वर्तवण्यात येत आहे. विदर्भात मागील २४ तासांत ३ ज्येष्ठ व्यक्ती मृत्य झाल्याची नोंद झाली असून थंडीने गारठल्यामुळं मृत्यू झाल्याची प्राथमिक शंका व्यक्त केली जात आहे. तर, डेथ ऑडिट रिपोर्ट अर्थात मृत्यूचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे.
एमआयडीसी, पाचपावली आणि वाडी पोलीस हद्दीत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. वाडी पोलीस स्टेशन हद्दीत श्रीकृष्ण रुग्णालयाशेजारी 65 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर मेडिकलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत मेट्रो पिलरखाली 65 वर्षीय पुरुष निपचित अवस्थेत आढळला असता त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आलं जिथं त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत बोस्टन कॅफेसमोर गॅरेजजवळ ज्येष्ठ नागरिक बेशुद्ध झाल्याचं दिसून आलंय त्यांना एम्समध्ये नेलं असता तिथं मृत घोषित करण्यात आले.
