#

Advertisement

Monday, December 15, 2025, December 15, 2025 WIB
Last Updated 2025-12-15T11:26:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरसह सर्व 29 महापालिकांची निवडणूक जाहीर

Advertisement

मुंबई : सोलापूर 29 महापालिकांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, 15 जानेवारी 2026ला मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. आजपासून सर्व महापालिकांमध्ये आचारसंहित लागू करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केलं आहे.
31 जानेवारीच्या आधी निवडणुका घेण्यासंदर्भातील आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. राज्यातील 29 महापालिकांपैकी 27 महापालिकांची मुदत संपली होती. 5 पालिकांची 2020 मध्येच मुदत संपली होती. तसंच मुंबईसह काही पालिकांची 2022 मध्ये मुदत संपली होती. 2023 मध्ये 4 पालिकांची मुदत संपली होती अशी माहिती निवडणूक आयुक्त दिशेन वाघमारे यांनी दिली.
जातवैधता सादर करण्याचे हमीपत्र सहा महिन्यात द्यावं लागणार आहे. जातवैधता पत्र न देऊ शकणाऱ्यांची वैधता रद्द होईल. एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार असणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. जी मतदारयादी वापरणार आहे, त्यासाठी 1 जुलै 2025 ही अधिसूचित यादी वापरली जाईल. ही मतदारयादी भारत निवडणूक आयोगाकडून घेतली असल्याने त्यात बदल करणे, डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. मताधिकार मोबाईल अॅपच्या माध्यमातून नाव, प्रभाग आणि मतदान केंद्र याची माहिती मिळेल. हे अॅड्रॉइवर असून, आयओएसवरही आणलं जाणार आहे. 


असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम 

अर्ज दाखल करण्याचा कालावधी - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 

अर्जाची छाननी - 31 डिसेंबर

उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी 2026

निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम यादी - 3 जानेवारी 2026

मतदान - 15 जानेवारी 2026

मतमोजणी - 16 जानेवारी  2026


एकूण जागा - 2869 

महिला 1442

अनुसूचित जाती - 341 

अनुसूचित जमाती - 77

नागरिकांचा मागास प्रवर्ग - 759 


29 महापालिका कोणत्या ?

एमएमआरडीए

1) मुंबई

2) नवी मुंबई

3) ठाणे

4) कल्याण डोंबिवली

5) वसई विरार

6) भिवंडी

7) पनवेल

8) मिरा भाईंदर

9) उल्हासनगर


पश्चिम महाराष्ट्र -

1) पुणे

2) पिंपरी चिंचवड

3) कोल्हापूर 

4) सांगली

5) सोलापूर

6) इचलकरंजी


उत्तर महाराष्ट्र

1) नाशिक

2) अहिल्यानगर

3) धुळे

4) जळगाव

5) मालेगाव


मराठवाडा

1) छत्रपती संभाजीनगर

2) लातूर

3) नांदेड - वाघाळा

4) परभणी

5) जालना


विदर्भ - 

1) नागपूर

2) अकोला

3) अमरावती

4) चंद्रपूर