Advertisement
महापालिका निवडणुकीसाठी वंचितसोबत आघाडी
मुंबई : भाजपा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसनेही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत 70 उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबईत काँग्रेसने वंचितसोबत आघाडी केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक - २०२६ साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. काँग्रेसने शिवडीमधून नरेंद्र राजाराम अवधूत यांना उमेदवारी दिली आहे, तसंच वडाळ्यातून रघुनाथ थवई, आणि माहीममधून दीपक वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबईत काँग्रेसने वंचितशी युती केली असल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसह थेट लढाई असणार आहे. काँग्रेससमोर फक्त भाजपा-शिवसेना नव्हे तर ठाकरे बंधूंचंही तगडं आव्हान आहे.
