Advertisement
मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीसोबत राष्ट्रवादी लढणार की नाही हे स्पष्ट नाही
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी भाजपा, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली असताना मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीसोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढणार की नाही? हे स्पष्ट नाही. जागा वाटपावरुन ही युती अडलेली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या यादीत फक्त 7 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष मिलिंद कांबळे आणि सहअध्यक्ष सोहेल सुभेदार यांच्या मान्यतेने बृहन्मुंबई महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा! असे राष्ट्रवादी काँग्रेसने यादी जाहीर करताना म्हटले आहे.
उमेदवारांची नावं खालीलप्रमाणे
1) वॉर्ड क्रमांक - 43 - अजित रावराणे
2) वॉर्ड क्रमांक 140 - संजय भिमराव कांबळे
3) वॉर्ड क्रमांक 78 - रदबा जावेद देऊलकर
4) वॉर्ड क्रमांक 48 - गणेश शिंदे
5) वॉर्ड क्रमांक 70 रुही मदन खानोलकर
6) वॉर्ड क्रमांक 51 - आरती सचिन चव्हाण
7) वॉर्ड क्रमांक 112 - मंजू रविंद्र जायस्वाल
