Advertisement
: लक्षवेधी :
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार एक असं नाव आहे, ज्यांच्याबद्दल तरुणाईला आजही कुतूहल आहे. काही तरुण मंडळींसाठी ते आदर्श आहेत. 12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस. आज त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षात पदार्पण केलं. शरद पवारांना आपला आदर्श मानावा असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत. आजची तरुण मंडळी छोट्याशा पराभवानंतर डिप्रेशनमध्ये जाते, निराश होते. आयुष्यासमोर हार पत्करतात. त्यांनी शरद पवारांचं उदहारण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे.
आपल्या कर्तुत्वाने आणि वर्तनाने इतर राजकीय नेत्यांसमोर एक चांगलं उदहारण ठेवलं. भले शरद पवारांचं फोडफोडीचं राजकारण आदर्श कसं ठरु शकतं, असा मुद्दा काही लोक उपस्थित करतील. पण राजकारणात सत्ता मिळवणं हे कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं उद्दिष्टय असतं. त्यानुसार तडजोडीच, फोडाफोडीच राजकारण केलं जातं. शरद पवारांचा एक खास गुण म्हणजे त्यांची न हरण्याची आणि न थकण्याची वृत्ती. शरद पवार कधी हार मानत नाही. यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचा आदर्श. शरद पवारांना घडवण्याचं श्रेय हे यशवंतराव चव्हाणांना जातं. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांनी कराडच्या प्रितीसंगमावर जाऊन यशवंतरावांचं दर्शन घेतलं आणि कामाला लागले. त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिजून काढला ते ही वयाच्या 83-84 व्या वर्षी. हार मानली नाही.
लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी खासदार निवडून आले. पण विधानसभेला अपयश आलं. पण म्हणून हार मानली नाही. ते आजही लोकांमध्ये जातात, फिरतात. हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्यात इतकी सकारात्मक ऊर्जा आहे की, त्यांनी कॅन्सरसारख्या रोगाला हरवलं. दुसऱ्याबाजूला आपला पक्ष चोरला म्हणून ओरड करणारे नेते दिसतात. शरद पवार यांच्याकडून शिकण्यासारखा आजच्या तरुणाईसाठी बऱ्याच गोष्टी आहेत. आज, त्यांचा वाढदिवस त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा !
