Advertisement
निवडणूक आयोग ; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निवडणूक नाही
मुंबइ : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घेण्याचा आदेश दिलेले असताना 29 महापालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे या महालिकेची निवडणूक होणार नाही, अशी चर्चा होती परंतु, वाढीव आरक्षणाचा मुद्दा असला तरी या महापालिकेची निवडणूक होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. परंतु, राज्यातील 34 जिल्हा परिषदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच तब्बल 18 ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे गेली असल्याने आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणूका मात्र घेता येणार नसल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याने अशा जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणूक होणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आजच्या अंदाजानुसार जानेवारी २०२६च्या अखेरच्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होऊ शकतील.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करीत असताना मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीबाबतही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीच्या आत राज्यातील केवळ 14 जिल्हा परिषदांचीच निवडणूकही घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यानुसार राज्यातील एकूण 34 जिल्हा परिषदांपैकी भंडारा आणि गोंदियामध्ये निवडणूक मात्र नियोजित नाही. उर्वरित 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मात्र, त्यापैकी तब्बल 18 ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे गेली असल्याने आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्यावर येथे जिल्हा परिषदा तसेच पंचायत समिती निवडणूक घेता येणार नाही, नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
