Advertisement
सोलापुरात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक
सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट होऊन निवडणूक लढवणार आहे. महापालिकेवर आघाडीचा महापौर बसवण्याचा ठाम निर्धार आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला. सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस] काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी एकत्रित आले होते.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे बैठकीत मार्गदर्शन करताना म्हनाले की, भाजपच्या विरोधात येऊ इच्छिणाऱ्या सर्व पक्षांना महाविकास आघाडी सोबत घेणार आहे. सोलापूर महापालिका निवडणूक संयुक्तपणे लढून आघाडीचा महापौर बसवणे हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे. त्यासाठी सर्व घटक पक्षांनी आपापली पूर्ण ताकद पणाला लावणे गरजेचे आहे. वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पार्टीलाही सोबत घेण्याचा मनोदय आहे.
या बैठकीस माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शंकर पाटील, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संतोष पाटील, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, शहर प्रमुख नाना मोरे, तसेच माकपचे युसुफ शेख मेजर, अनिल वासम, मनसेचे विनायक महिंद्रकर, जैनुद्दीन शेख, प्रशांत इंगळे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
