Advertisement
महायुतील पक्षांनी निवडल्या वेगळ्या वाटा
मुंबई : राज्याच्या सत्तेत असणाऱ्या महायुतीत अर्थात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये महापालिका निवडणुकीत वितुष्ट आले असून, राज्यातील काही निवडणुकांमध्ये याच महायुतील पक्षांनी वेगळ्या वाटा निवडल्याचे स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजी नगरात महायुती होणार नाही. ज्यामुळं शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांनी वेगळे लढण्याची तयारी केल्याची शक्यता वर्तवण्यात आली, ज्यानंतर संजय शिरसाट यांनी याबाबतची अधिकृत माहिती देत स्थानिक नेत्यांच्या अहंकारामुळं युती तुटल्याचं वक्तव्य केले. तिथं पुण्यातही शिवसेना भाजप युती तुटल्याची माहिती समोर आली. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याच्या आरोपानं वेधले. पुण्याप्रमाणेच पिंपरी -चिंचवड मधील शिवसेना- भाजप युती संदर्भात उदय सामंत घेणार प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, त्यानंतरच युती बाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे म्हटले जात आहे. अमरावतीतही भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याचे समजते. सांगली महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे स्वबळावर लढणार असून भाजपा बरोबर असणारी युती सांगली महापालिकेत तुटली, असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत महायुती तुटली असून, शिंदे गट आणि भाजप दोन्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून स्वबळाचा नारा दिला आहे. नवी मुंबईतही महायुती तुटली असून, भाजपा आणि शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत, जागा वाटपाचा तिढा न सुटल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
