Advertisement
महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांनी सोपवली जबाबदारी
सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. पक्षामध्ये ४६५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले होते. जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात मंगळवारी सकाळी १० वाजता मुलाखतीला सुरुवात झाली. दुपारनंतर मुलाखती देण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांचा मोठी मांदियाळी होती. सायंकाळी आठ वाजता ४६५ इच्छुकांपैकी ४२७ जणांनी मुलाखती दिल्या.
सोलापूर शहरात मंगळवारी राष्ट्रवादी पक्षाकडे उच्चशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित उमेदवारांनी मुलाखती दिल्यामुळे सोलापूरच्या विकासासाठी सोलापूर महानगरपालिकेत जाण्यासाठी सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर आसुसलेला असल्याचे दिसून आले. प्रभागाची सामाजिक समीकरणे, राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक कार्य, प्रवर्गानुसार कास्ट सर्टिफिकेट, निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे आदी प्रश्न इच्छुक उमेदवारांना विचारण्यात आले. सोलापूरच्या विकासासाठी झपाटलेल्या उच्चविद्याविभूषित युवक युवतींनी मात्र जोशपूर्ण आणि दमदार मुलाखती दिल्या.
