Advertisement
सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष सोडून जात असताना काँग्रेस भवनात महापालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला यामध्ये जरी राज्यात भाजप मोठा पक्ष राहिला असला तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. 12 पैकी केवळ चार नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष झाला परंतु आठ ठिकाणी भाजपचा पराभव झाला. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. स्वतः खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत या मुलाखती होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. अनेक जण वाजत गाजत येऊन मुलाखती दिल्या. पक्षाची शहरात वाताहत होत असताना ही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
ग्रेस भवनात मुलाखती घेण्यासाठी खासदार शिंदे यांच्यासह माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, ज्येष्ठ नेते अशोक निम्बर्गी, माजी महापूर अलका राठोड, माजी महापौर सुशीला अबूटे, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, शहराचे अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, शिक्षण समितीचे माजी सभापती सुनील रसाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, प्रदेश सरचिटणीस श्रीशैल रणधीरे आदी उपस्थित होते.
