Advertisement
धनंजय मुंडेंनी थेट दिल्ली गाठली : मंत्रीमंडाळात येण्यासाठी प्रयत्न
मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रावादीच्या मंत्र्याच्या अटकेच्या हालचाली सुरु असताना धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठून भाजपच्या बड्या नेत्याची भेट घेतली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रीमंडाळात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे सदनिका वाटपातील गैरव्यवहार अडचणीत सापडले आहेत. 1995 सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 20 फेब्रुवारी 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायालयाने हीच शिक्षा सुनावली आहे. माणिकराव कोकाटे विरोधात वॅारंट निघाल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी हालचाली घडताना दिसत आहेत.
या घटनेच्या पार्शवभूमीवर मंत्रीमंडळात परत येण्यासाठी धनंजय मुंडे फिल्डिंग लावत असल्याचे समजते. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडत असताना धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठली आहे. धनंजय मुंडे यांनी संसदेत भाजप नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्री पद गेल्यापासून धनंजय मुंडे यांच्याकडे पक्षाने कोणतेही पद दिले नव्हते. धनंजय मुंडे यांचे जबाबदारी मिळवण्याचे प्रयत सुरु आहेत.
आता आपल्याला रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या असं मुंडेंनी एका जाहीर कार्यक्रमात म्हटले होते. मात्र, यानंतरही पक्षाकडून तशा प्रकारच्या सकारात्म हालाचली झालेल्या नाहीत. यामुळे धनंजय मुंडे आता स्वत:च प्रयत्न करताना दिसत आहेत.
