Advertisement
मंगरुळ : तुळजापुर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणुन सेवा बजावलेले मल्हारी माने यांची सोलापूर महानगर पालिका प्रशासन अधिकारी व चीलवंते यांची वर्धा उपशिक्षण अधिकारी म्हणुन पदोन्नतीझाल्याबद्दल मंगरुळ बिटच्या वतीने संत गाडगे बाबा आश्रम शाळा येथे मंगळवार शाल, श्रीफळ l, पुष्पहार व भेट वस्तू देऊन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांनी माने व चीलवांते यांच्या सेवाकार्यकाळात त्यांनी राबवलेल्या शालेय उपक्रमामुळे मंगरुळ बिटच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत गेला हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले तसेच त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनीही उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांना सखोल मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हाके, काळे, वाले, डोलारे, मंगरुळ परिसरातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांची उपस्थिती होती यासाठी संत गाडगे बाबा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर क्षिरसागर व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
