#

Advertisement

Friday, December 26, 2025, December 26, 2025 WIB
Last Updated 2025-12-26T15:03:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विविध मागासवर्गीय महामंडळात उद्दिष्टपूर्तीस दिरंगाई

Advertisement

 

माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचा आरोप

सोलापूर : राज्यात विविध मागासवगीर्याच्या आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या चार महामंडळाकडून उद्दिष्ट पूर्ती करण्यात दिरंगाई होत आहे असा आरोप करत या महामंडळाच्या निधीमध्ये वाढ करावी, अशी मागणी माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यात संत रोहिदास महाराज आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ यासह विविध चार महामंडळे कार्यरत आहेत. या महामंडळा अंतर्गत देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठी दिरंगाई होत आहे. अनुदान वाटपात दिरंगाई झाली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्णपणे फोल ठरले आहेत. शासनाने दिलेल्या माहितीच्या आधारेच पाहिले असता या महामंडळा अंतर्गत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आले असल्याचे दिसून येते. निवडणुकीपुरता मागासवर्गीय यांचा उदो करावयाचा त्यानंतर दिलेली आश्वासने मात्र पाळायचे नाहीत असे सरकारचे काम चालू आहे, असा आरोप प्रा. ढोबळे यांनी केला आहे. मागासवर्गीय जनता या भूलथापांना बळी पडणार नाही, असेही माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले.