Advertisement
महाराष्ट्रात संताप : आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न
यवतमाळ : शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जातीचा प्रश्न विचारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. होता. उच्च जात कोणती? असा प्रश्न आठवीच्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आल्याने संतापाची लाट पसरली आहे. यानंतर संस्थेवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट पीक अप्स संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबिविली होती. यात जवळपास 24 हजार विद्यार्थी सराव करीत होते. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा सोडू शकतील अशी ही व्यवस्था होती. या टार्गेट पीक अप्सच्या आठवीच्या दुसऱ्या ऑनलाइन सराव चाचणीच्या प्रश्न पत्रिकेत विचारण्यात आलेला एक प्रश्न चांगल्याच वादाचे कारण बनण्याची शक्यता आहे.
या ऑनलाइन प्रश्न पत्रिकेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नावलीत 'उच्च जातीचे नाव काय?' असा प्रश्न विचारण्यात आला असून पर्याय समाजातील वर्णव्यवस्था दाखवणारे असल्याने शिक्षकांसह शैक्षणिक वर्तुळातून मोठा संताप उमटला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातून जाती निर्मूलन कसे करणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.
काही वेळा प्रश्नपत्रिका काढणारे मूर्खपणा करतात. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कधीकधी विषय नसलेले प्रश्नही प्रश्नपत्रिकेत टाकल्याचं आपण पाहिलं आहे. या विभागाने त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे," असं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंना यासंदर्भात विचारण्यात आलं असता भाजपाचं सरकार आल्यावर आणखी काय होणार असा टोला लगावला.
जर असं घडलं असेल तर ते योग्य नाही. अशाप्रकारे परीक्षेच्या माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणं योग्य नाही. हे माझं खातं नाही पण संबंधित विभाग आणि मंत्री कारवाई करतील," असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले आहेत.
