Advertisement
मुंबई : आमच्या कुटुंबियांच्या सर्वांगिण उत्कर्षासह शाहू शिक्षण संस्था उभारण्यात शरद पवार साहेब यांचे माझे वडील लक्ष्मणराव ढोबळे यांचे मोठे सहकार्य राहीले आहे. साहेबांची सावली म्हणूनच वडीलांची ओळख होती ती आजही आहे. त्यांच्या विश्वास पात्र ठरल्यानेच माझ्यावरही साहेबांंनी पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्याबद्दल नेहमीच आमच्या कुटुंबियांच्या मना कृतज्ञता राहिली आहे, यामुळेच मानपत्राद्वारे साहेबांना वाढदिवस शुभेच्छा आम्ही दिल्या, असे काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा ॲड. कोमल ढोबळे-साळुंखे यांनी सांगितले.
मुंबई येथे लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त येथे एका विशेष समारंभात साहेबांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲड. कोमल ढोबळे-साळुंखे लक्षवेधीशी बोलत होत्या.
राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अतुलनीय योगदान देणाऱ्या पवार साहेबांना अभिष्टचिंतन करण्यासाठी, माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे साहेब, महिला प्रदेश उपाध्यक्षा ॲड. कोमल ढोबळे-साळुंखे आणि शाहू शिक्षण संस्थेचे संचालक अजय साळुंखे यांच्या वतीने विशेष मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राच्या विकासातील साहेबांच्या अमूल्य योगदानाबद्दल शरदचंद्रजी पवार यांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मानपत्र अर्पण करताना पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि उत्साही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा क्षण साहेबांच्या नेतृत्वावर असलेला कार्यकर्त्यांचा अढळ विश्वास दर्शवणारा ठरला.
