Advertisement
मुंबई : महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपनं गुलाल उधळलाय, सर्वात जास्त जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय, भाजप पाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादीनं देखील अनेक नगपरिषदांवर त्यांचा झेंडा फडकवला आहे.
महाराष्ट्रात भाजपनं 124 नगरपरिषदांवर झेंडा फडकवला. शिवसेनेनं 61 ठिकाणी सत्ता स्थापन केली तर पवारांच्या राष्ट्रवादीनं 36 नगरपरिषदांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला 27 नगरपरिषदांवर सत्ता स्थापन करण्यात यश आले तर, ठाकरेंची शिवसेना 8 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 12 नगरपरिषदांवर विजय मिळवता आला. स्थानिक आघाडींनी 20 ठिकाणी सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात महायुतीनं 221 नगरपरिषदांवर झेंडा फडकवला. मविआनं 47 नगरपरिषदांवर सत्ता स्थापन केली. स्थानिक आघाडीनंही 20 नगरपरिषदांवर विजय मिळवला.
विदर्भात भाजपचा विजय
विदर्भ एकूण जागा 100 विदर्भात भाजपनं 55 ठिकाणी विजय, शिवसेना 11, दादांची राष्ट्रवादीचा 2 ठिकाणी विजय झाला. तर काँग्रेस 19 ठाकरेंच्या शिवेसेनेला 2 तर पवारांच्या राष्ट्रवादीला देखील 4 जागा मिळाल्या तर स्थानिक आघाडीला 7 ठिकाणी विजय मिळाला.
मराठवाडा एकूण जागा 52
मराठवाड्यात देखील भाजप आघाडीवर आहे, भाजपचा 18 ठिकाणी विजय झाला, शिवसेनेचा 11, राष्ट्रवादीचा 11 ठिकाणी विजय झाला, तर काँग्रेसला 4, ठाकरेंच्या शिवसेनेला 3, पवारांच्या राष्ट्रवादीला 2, आणि स्थानिक आघाडीला 3 जागा मिळाल्या.
उत्तर महाराष्ट्र एकूण जागा 49
उत्तर महाराष्ट्रात देखील भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजप 21, शिवसेना 15, राष्ट्रवादी 6 तर काँग्रेस 1, ठाकरेंची शिवसेना 1, पवारांची राष्ट्रवादी 2 आणि स्थानिक आघाडीचा 3 ठिकाणी विजय झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र एकूण जागा 60 पश्चिम महाराष्ट्रात देखील भाजपनंच गुलाल उधळला. 21 ठिकाणी भाजपचा विजय झाला, शिवसेना 14, राष्ट्रवादी 14, तर काँग्रेसला 2 ठिकाणी विजय मिळवता आला. ठाकरेंची सेना 1, पवारांची राष्ट्रवादीनं 3 ठिकाणी सत्ता स्थापन केली. तर स्थानिक आघाडीला 5 ठिकाणी यश मिळाले.
कोकण एकूण जागा 27
कोकणात भाजपनं 9 ठिकाणी विजय मिळवला. शिंदेंच्या शिवसेनेनं 10 तर राष्ट्रवादीला 3 ठिकाणी विजय मिळवता आला. तर काँग्रेसनं 1,ठाकरेंच्या शिवसेनेनं 1, पवारांच्या राष्ट्रवादी 1 तर स्थानिक आघाडीनं 2 ठिकाणी विजय मिळवला.
