#

Advertisement

Thursday, January 1, 2026, January 01, 2026 WIB
Last Updated 2026-01-01T11:18:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पिंपरी-चिंचवडमधील पवारांच्या एकजुटीचा काय अर्थ ?

Advertisement

शरद पवार 'एनडीए'मध्ये जाणार?

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही भाग पवार कुटुंबाचे बालेकिल्ले मानले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानगरपालिका निवडणुकीसाठी एक नवी रणनीती आखली आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांची भूमिका भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा वेगळी राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी हातमिळवणी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याने या मागे वेगळी रणनिती असल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार समजते की, शरद पवार गटातील अनेक महत्त्वाचे नेते आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांनंतरच पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी दोन्ही महापालिकेसाठी हे पक्ष एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची झालेली भेट या संपूर्ण घडामोडींचा टर्निंग पॉइंट ठरली.  पवार कुटुंब आता एकत्र आले आहे, असे वक्तव्य करत त्यांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांचे हे वक्तव्य केवळ स्थानिक निवडणुकीपुरते मर्यादित नसून त्याचे संकेत राष्ट्रीय राजकारणापर्यंत जात असल्याचे बोलले जात आहे.
पिंपरी चिंचवडमधील ही युती वरवर पाहता दोन समान विचारधारेच्या पक्षांमधील स्थानिक तडजोड वाटत असली, तरी त्यामागे एक मोठा राष्ट्रीय संदेश दडल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. हे शरद पवार यांची एनडीएच्या दिशेने पडलेली पहिले पाऊल तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी अलीकडेच अजित पवार यांच्याशी युती करण्यात काहीच गैर नसल्याचे म्हटले होते. अजित पवार यांनी आपली विचारधारा कधीच सोडलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्येही बदलत्या राजकीय वातावरणाचे संकेत मिळत आहेत.