Advertisement
माघार घेतलेल्या भाजपच्या उमेदवार पूजा मोरे यांनी व्यक्त केली खंत
पुणे : "मी बिनलग्नाची मुलगी होते. राजकारण घाणेरडं आहे, असं म्हणतात.पण माझ्या बापाने काळजावर दगड ठेवून मला राजकारणात आणलं.पण, मी सुद्धा तशी वागले आणि संघर्ष करत राहिले", असं मोठं प्रभाग क्रमांक 2 मधून माघार घेतलेल्या भाजपच्या उमेदवार पूजा मोरे यांनी केले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने प्रभाग क्र. 2 मधून पूजा मोरे यांना उमेदवारी घोषित केली होती. परंतु, त्यानंतर कार्यकर्त्यांनी या उमेदवारीवरून टीकेची झोड उठवली आणि पक्षाच्या नेत्यांना धारेवर धरले. इतकच नव्हे तर सोशल मीडियावरही टीका-टिप्पणी झाली. भाजप कार्यकर्त्यांनी पूजा मोरे यांना प्रचंड ट्रोल केले. या ट्रोलिंगमुळे पूजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर पूजा मोरे यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली.
पूजा मोरे म्हणाल्या,आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. हे सर्व बोलत असताना मला मागील 10-12 वर्षांचा सगळा संघर्ष आठवतोय.मी बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यातील गोधाकाठच्या अत्यंत छोट्या गावात जन्मलेली मुलगी होते.माझ्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाहीत. पण मी ज्या शेतकऱ्यांसाठी काम करत होते, त्यामुळे मला वयाच्या 21 व्या वर्षी पंयायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलं गेले. मी नेहमीच महिलांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं.माझ्या खूप कमी वयात मी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या.त्यावेळी माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे.त्यावेळी मी पोलीस स्टेशनच्या बाथरूमबाहेर दोन दोन ताप झोपलेली आहे.
न्यायालयात वकीलाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशात पैसे नसायचे. पण अशा परिस्थितीत त्यांचा आवाज बुलंद केला. मी बिनलग्नाची मुलगी होते.राजकारण घाणेरडं आहे, असं म्हणतात.पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळीज ठेवून मला राजकारणात आणले. छत्रपती संभाजी राजेंच्या आशिर्वादाने मराठा क्रांती मोर्चात आम्ही काम करत असताना संभाजी राजेंनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं.लग्नानंतर एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या कामासाठी बाहेर पडले आणि लोकांसाठी काम करायला लागले,असंही पूजा मोरे यांनी म्हटले.
