#

Advertisement

Monday, January 19, 2026, January 19, 2026 WIB
Last Updated 2026-01-19T11:52:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी अटकेतील भाजप उमेदवाराचा विजय

Advertisement

सोलापूर : सोलापुरात मनसे मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या भाजप उमेदवार शालन शिंदे यांचा विजय झाला आहे. शालन शिंदे यांना हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जेलमध्ये असूनहाी प्रभाग क्र. 2 मधून शालन शिंदे विजयी झाल्या आहेत. मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी शालन शिंदे यांच्यासह 15 आरोपी अटकेत आहेत.
सोलापूर महापालिकेत भाजपा बहुमताचा आकडा गाठण्याच्या जवळ आलं आहे. सोलापूर महापालिकेतील प्रभाग 2 कडे सर्वांचं लक्ष होतं. मनसेचे (MNS) युवा नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याने येथे काय निकाल लागणार याची सर्वांना उत्सुकता होती. भाजपाने येथून शालन शिंदे यांना उमेदवारी दिली  होती. भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख हेही मैदानात होते. प्रभाग 2 मधील भाजपचे सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. किरण देशमुखांनी तब्बल 11 हजार मतांनी विजय मिळवल्याची माहिती आहे.
याच प्रभागातील प्रभाग 2 क मधील भाजप उमेदवार शालन शिंदे अटकेत आहेत. मनसेच्या बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येनंतर त्याचा निकालावर परिणाम होईल असं वाटत होतं. त्यामुळे लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापुरातील प्रभाग 2 मध्ये भाजपचे 4 ही उमेदवार विजयी झाले आहेत.