Advertisement
मुंबई : महापौरपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणास शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी चक्क उद्धव ठाकरेंची शिवसेना उभी राहण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदेंना चेकमेट करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पडद्याआड चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौर निवडीच्या एक मास्टर प्लॅन आखण्यात आला आहे.
महापौर पदासाठी शिंदेंची सेना उत्सुक असून त्यासाठी ते भाजपावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे.
आकड्यांच्या खेळात स्वत:चं महत्त्व लक्षात घेत शिंदेंकडून भाजपाच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे भाजपाने ठाकरेंची चर्चा करुन आपलाच महापौर निवडून आणण्याची वेगळीच योजना आखली आहे. या मास्टर प्लॅननुसार महापौर निवडीच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील असं दोन्ही पक्ष ठरवत असल्याचं वृत्त आहे. माझे 65 नगरसेवक महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस अनुपस्थित राहतील असं ठाकरेंनी फडणवीसांना कळवल्याचं समजतं. असं झालं तर 228 च्या महापालिकेमध्ये 114 चं बहुमत राहणार नाही. या परिस्थीमध्ये महापौर निवडीसाठी शिंदेंची गरज कमी होईल. उद्धव ठाकरेंनीच फडणवीसांना फोन करुन या विषयावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
