Advertisement
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यानुसार माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सोलापूर जिल्हा (ग्रामीण) कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी दिनांक ०२/०१/२०२६ शिवरत्न बंगला, शंकरनगर येथे झाली. या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी निरिक्षक व सह निरिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. निरिक्षक व सह निरिक्षक यांनी संबंधित तालुक्याचा आढावा व इच्छुकांच्या मुलाखती घेऊन कोअर कमिटीस अहवाल सादर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रा.डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर निरीक्षक म्हणून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तर, मा.आ. नारायण (आबा) पाटील हे सांगोलाचे निरीक्षक असतील, मा.आ. उत्तमराव जानकर हे निरिक्षक म्हणून मंगळवेढाची जबाबदारी सांभाळणार आहेत. याशिवाय मा.आ. राजु खरे हे उत्तर सोलापूरचे निरीक्षक असतील, मा.आ. अभिजीत पाटील यांच्यावर निरीक्षक म्हणून बार्शी व पंढरपूरची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सह निरीक्षक म्हणून वसंतराव देशमुख-बार्शी व पंढरपूर, रविंद्र पाटील-उत्तर सोलापूर, नागेश फाटे- बार्शी, पंढरपूर, सूरज देशमुख - सांगोला, सौ. विनंती कुलकर्णी- सांगोला, धनंजय साठे-मंगळवेढा, सागर पडगळ- अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, अरुण तोडकर-
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शंकरराव बागल-मंगळवेढा, रणजित चवरे-उत्तर सोलापूर अशी नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी झालेल्या बैठकीस धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतराव दौलतराव देशमुख, कार्याध्यक्ष रविंद्र शहाजीराव पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
