#

Advertisement

Thursday, January 29, 2026, January 29, 2026 WIB
Last Updated 2026-01-29T12:13:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दादांच्या निधनाचा प्रचंड धक्का ; प्रचार काही काळ थांबविला : ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

Advertisement

मंगळवेढा : सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कांग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष्मीदहीवडी या गटातून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची उमेदवारी जाहीर केली. मंगळवारी (ता.२७) अर्ज माघारी घेण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना दुसऱ्याच दिवशी बुधवारी (ता. २८) अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. यामुळे अखंड महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. राज्यावर संकट कोसळेले असताना निवडणुकीचा प्रचार करणे योग्य नसल्याने तसेच अजित दादांच्या निधनामुळे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना अश्रु अनावर होत त्यांची तब्येतही काहीशी खालावली, हा धक्का कोणालाही सहन झाला नाही, याच कारणातून प्रचाराच्या वेळापत्रकातील सर्व कार्यक्रम रद्द करून प्रचार एक-दोन दिवस पूर्णपणे थांबविला असल्याचे लक्ष्मीदहीवडी गटातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित असलेल्या उमेदवार ऍड. कोमलताई साळुंखे, ढोबळे यांनी सांगितले. पुढील एक-दोन दिवसात साधेपणाने प्रचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे पदाधकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे बारामती येथे अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते.