Advertisement
सुरेंद्र पठारे यांच्याकडे तब्बल 271.85 कोटी रुपयांची संपत्ती
पुणे : महानगर पालिकेची एकूण सदस्य संख्या 162 आहे. पुण्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. पुण्यात शेवटची महापालिकेची निवडणूक 2017 साली झाली होती. यात भाजपने 97 जागा जिंकून बाजी मारली होती.
भाजपचं लक्ष्य पूर्ण बहुमताचं आहे. भाजपने मेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत. यात भाजपने उमेदवारी दिलेले सुरेंद्र पठारे हे पुण्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेले सगळ्यात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्याकडे तब्बल 271.85 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सुरेंद्र पठारे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी त्यांची मालमत्ता 271.85 कोटी रुपये एवढी दाखवली आहे. सुरेंद्र पठारे यांच्याकडे मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा क्रिस्टा अशा आलिशान गाड्या आहेत. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक असून सुमारे 1.75 किलो सोन्याचे दागिने आहेत. दुसऱ्या क्रमांकावर खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे आहे. सायली वांजळे यांच्या नावावर 77.65 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
दरम्यान, उमेदवारांनी माघार केव्हा घेतली? त्यांनी दबावाचा काही आरोप केला का? याची शहानिशा करून सविस्तर अहवाल द्या, असा निवडणूक आयोगाने यंत्रणांना आदेश दिला आहे. निवडणूक आयोगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. काही ठिकाणी सत्ताधारी नेत्यांकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आज अपक्ष उमेदवारांनाही चिन्ह वाटप करण्यात येणार. अपक्ष उमेदवारांनी सुचवलेल्या चिन्हा मधून एका चिन्हाचे वाटप उमेदवारांना करण्यात येणार. पक्षाची संख्या मोठी असल्याने चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवारांना शर्तीचे प्रयत्न करावे लागणार.
