Advertisement
राजकारण धक्कादायक वळणावर
पुणे : पुण्याचे पालकमंञी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या घड्याळावर एक-दोन नव्हे तर चार गुन्हेगार महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. त्यातील आंदेकर टोळीतील दोन महिला उमेदवार तर सध्या तुरूंगात आहेत. पुण्याचे राजकारण यामुळे धक्कादायक वळणावर आले आहे. गुन्हेगारांना तिकिटं देणे अजित पवार यांना महागात पडणार आहे. अजित पवारांना घेरण्याची रणनिती भाजपने आखली आहे.
आंदेकर टोळीतील लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर निवडणूक लढवत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तिसरे तिकिट गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणेला तिकिट दिले आहे. बापू नायर या ऑन रेकॉर्ड गुंडालाही थेट घड्याळ चिन्हावर तिकिट दिले गेले आहे.
याच मुद्यावरून भाजपचे केंद्रीय मंञी मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांना टार्गेट केले आहे. पण त्यांच्याच पक्षाने आंबेगावात गुंड रोहिदास चोरगे यांच्या पत्नीला तिकिट दिल्याबाबत माञ हेच मोहोळ काहीच बोलत नाहीत. अजित पवारांना याबाबत विचारलं असता त्यांनी सोईस्करपणे रिपाईच्या सचिन खरातांना कसे पुढे केलं. गंम्मत म्हणजे अजित पवार जेव्हा हे गुन्हेगारी उमेदवारीचं राजकीय पाप सचिन खरातवर ढकलत होते तेव्हा तेच सचिन खरात पाठीमागेच बाईटफ्रेम उभे होते बरं. माध्यमांनी खरातांना तिथेच पकडताच त्यांनी दादांनी चर्चा करून बोलतो, असं सांगत शब्दश: पळ काढला. तर, दरम्यान, भाजपचेच महसूल मंत्री बावनकुळे यांनी तर या सगळ्यावर कडी करत या क्रिमिनल उमेदवारांवरचे गुन्हे अजून सिद्ध कुठे झालेत असा जावई शोध लावला आहे.
