Advertisement
सोलापूर : सोलापुरात महापालिका निवडणुकीला जोर येत असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील महिला पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये शहराच्या अध्यक्षा संगीता जोगधनकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनीही राजीनामा दिला आहे. तर युवती अध्यक्षा किरण माशाळकर यांनीही आपल्या युवती अध्यक्षपदाचा राजीनामा देताना पक्षामध्ये सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप केला आहे. पक्षासाठी युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अन् ऊर्जा निर्माण केली. संघटना वाढीसाठी काम केले मात्र, निवडणुकीच्या कोणत्याही प्रक्रियेत सहभागी केले गेले नाही, विश्वासात घेतले गेले नाही या शब्दात माशाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
