Advertisement
अहिल्यानगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत उभे असलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहेत. गेल्या २४ तासांपासून त्यांचा कुटुंबीयांशीही संपर्क नाही, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी दिली आहे.
केडगाव परिसर संवेदनशील असल्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीच हे अपहरण झालं असावं, असा संशय विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी या गायब उमेदवारांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांपैकी एक उमेदवार भाजपच्या, तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवाराविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात होता. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गायब उमेदवारांचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.
