#

Advertisement

Wednesday, February 4, 2026, February 04, 2026 WIB
Last Updated 2026-02-04T13:38:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ग्रामस्थांच्या मागण्या सोडविण्याची प्रतिज्ञा !

Advertisement

ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा निर्धार

मंगळवेढा : जिल्हा परिषदेच्या लक्ष्मीदहिवडी गटातील ग्रामस्थांच्या समस्या व मागण्यांना केवळ आश्वासनांपुरते न ठेवता ठोस कृतीतून सोडवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवित असलेल्या अधिकृत उमेदवार ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा यांनी व्यक्त केला आहे. लक्ष्मीदहिवाडी गटातील ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व अडचणी, समस्या व मागण्या त्यांनी लेखी प्रतिज्ञापत्राद्वारे औपचारिकरीत्या स्वीकारल्या आहेत.
या प्रतिज्ञापत्रातील प्रत्येक मुद्दा टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले. रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, ड्रेनेज या मूलभूत नागरी सुविधांसह शेतकरी, महिला बचत गट, शाळा, वसतीगृह, विद्यार्थी शिष्यवृत्ती, क्रिडा आदी प्रश्नांवरही वेळबद्ध आणि ठोस उपाययोजना राबवण्याची कटिबद्धता त्यांनी व्यक्त केली आहे.
हा केवळ शब्दांचा करार नाही, तर नागरिकांच्या विश्वासावर दिलेली हमी आहे. प्रत्येक समस्येचे नियोजनबद्ध निराकरण करून ग्रामस्थांचा विश्वास अधिक दृढ करणे हेच माझे उद्दिष्ट आहे, असे ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले. ग्रामस्थांमध्ये या प्रतिज्ञापत्राबाबत सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. लक्ष्मीदहिवडी गटाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.