#

Advertisement

Friday, February 27, 2026, February 27, 2026 WIB
Last Updated 2026-02-27T13:31:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजप सोलापूर जिल्हाध्यक्षांचे जि. प. सदस्यत्व रद्द करा

Advertisement

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून न्यायालयात याचिका दाखल 

सोलापूर : भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांचे सांगोला शहरात आणि सांगोला ग्रामीणमध्ये अशा दोन ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नाव आहे. तसेच दोन्ही ठिकाणचे मतदान कार्डही वेगळे आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 31 नुसार कुठल्याही भारतीय नागरिकाला एकाच ठिकाणी मतदार नोंदणी करता येते. या कलमानुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आर. वाय. घुटुकडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केले असून त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्याची थेट मागणी करण्यात आली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांचे सांगोला शहरात आणि सांगोला ग्रामीणमध्ये अशा दोन ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नाव आहे. तसेच दोन्ही ठिकाणचे मतदान कार्डही वेगळे आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 31 नुसार कुठल्याही भारतीय नागरिकाला एकाच ठिकाणी मतदार नोंदणी करता येते. या कलमानुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आर. वाय. घुटुकडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चेतन सिंह केदार हे 2016 साली सांगोला नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर सध्या ते जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. केदार यांच्या पत्नी सुजाता केदार या सांगोला नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेविका म्हणून निवडून आले आहेत.