#

Advertisement

Thursday, February 26, 2026, February 26, 2026 WIB
Last Updated 2026-02-26T11:23:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तपास अत्यंत योग्य दिशेने सुरू

Advertisement

अजित पवार विमान अपघात प्रकरणी CID ची पत्रकार परिषद

पुणे : अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास अत्यंत योग्य दिशेने आणि प्रोफेशनल पद्धतीने सुरु असल्याचं सीआयडीने सांगितलं आहे. पहिल्या दिवसापासून प्रोफेशनल पद्धतीने तपास सुरु आहे. या आकस्मिक मृत्यूमागे घातपात आहे का हादेखील तपासाचा भाग आहे. दुसरा भाग म्हणजे गुन्हेगारी कट आहे का याचा देखील तपास होत आहे अशी माहिती सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी आतापर्यंत सुरु असलेल्या तपासाची दिशा आणि वेग याबद्दल माहिती दिली. 
बारामतीतील 28 जानेवारीच्या विमान अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवार आणि इतरांच्या अकस्मात मृत्यूचा तपास 194 अंतर्गत सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या आकस्मिक मृत्यूमागे घातपात आहे का? हा देखील तपासाचा भाग आहे. दुसरा भाग म्हणजे गुन्हेगारी निष्काळजीपणा आहे का याचा देखील तपास सुरु आहे. तिसरा भाग म्हणजे हा गुन्हेगारी कट आहे का या अंगाने देखील तपास होत आहे, अशी माहिती सुनील रामानंद यांनी दिली. अनेक संस्था या तपासात सहभागी आहेत. या संस्थांचा अहवाल देखील सीआयडीच्या तपासात समाविष्ट करण्यात येणार आहे. या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्यासाठी देखील पत्र देण्यात आलं आहे. तपास योग्य दिशेने चालला आहे असं त्यांनी सांगितलं आहे.
VSR कंपनीवर DGCA कडून कारवाई झालीय, तुमच्या तपासात या कंपनीकडून हलगर्जीपणा आढळून आलाय का? असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, तांत्रिक तपास हा वेगळा भाग आहे आणि आमचा सीआयडीचा तपास हा आकस्मिक मृत्यूबद्दल आहे. आमच्या तपासात काही पुरावे मिळाले आहेत. AAIB चा अहवाल आला की तो आमच्या तपासात समाविष्ट केला जाईल. AAIB चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निष्कर्ष काढला जाईल.

रोहित पवारांची पोलिसांशी चर्चा
'दोन दिवसांपूर्वी डीजीसीएकडून एक अहवाल आला, 24 फेब्रुवारीचा हा अहवाल असून. बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 ला पदाधिकारी, समर्थकांसह मरीन ड्राईव पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल करायला गेलो होतो. पण काहींनी शंका उपस्थित करत, मी मुंबईला एफआयआर करू शकतो असा प्रश्न उपस्थित केला. झिरो एफआयआर कॉन्सेप्टअंतर्गत एफआयआर दाखल करता येऊ शकतो. मुंबईत हे शक्य होतं पण ते स्वीकारलं नाही, म्हणून आज आम्ही बारामती पोलीस स्टेशन ला आलोय', असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.