#

Advertisement

Friday, February 6, 2026, February 06, 2026 WIB
Last Updated 2026-02-06T11:44:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲड. कोमल ढोबळे यांचा विजय निश्चित

Advertisement

आमदार सोबत असल्याचा अतिआत्मविश्वास करूणा शिवशरण यांना नडणार 

मंगळवेढा : लक्ष्मीदहिवडी जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाच्या उमेदवार ॲड. कोमल ढोबळे यांनी प्रभावीपणे लोकांच्या प्रश्नावर व घरटी प्रचार यंत्रणा राबवल्यामुळे त्याचा त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. मात्र, तसा प्रचार व यंत्रणा भाजपच्या उमेदवार करूणा शिवशरण यांनी राबवली नाही. केवळ आमदार समधान अवताडे यांच्यामुळे आपण सहज विजयी होऊ शकतो हा अतिआत्मविश्वास बाळगल्यामुळे त्या अडचणीत येऊ शकतात. ॲड. कोमल ढोबळे यांना भगीरथ भालके व त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा प्रणिता बालके यांच्यासह अखेरच्या टप्प्यात बबनराव अवताडे, अनिल सावंत, लक्ष्मी दहिवडी-आंधळगाव जुन्या पारंपरिक लक्ष्मणराव ढोबळे समर्थकांची मदत होऊ शकते. या कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाच्या उमेदवार ॲड. कोमल ढोबळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 

भाजपच्या उमेदवार करूणा शिवशरण यांच्या पराभवाच्या कारणांची चर्चा आताच होऊ लागली आहे, ही कारणे पुढील प्रमाणे मांडली जात आहेत. 

  • - करूणा शिवशरण या मतदार संघातील नाहीत, त्यामुळे त्यांना त्यांच्या विजयासाठी सर्वस्वी आमादार समाधान आवताडे यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु, अड. कोमल ढोबळे या स्वतः सक्षम असल्यामुळे त्यांनी घरटी प्रचारावर भर दिला. 
  • - तालुक्यात तुल्यबळ असलेल्या भारतीय जनता पार्टीला आंधळगाव आणि लक्ष्मी दहिवडी या दोन मोठ्या गावात आपला पंचायत समितीला उमेदवार देता आला नाही. ही बाब या दोन गावातील लोकांच्या अस्मितेशी निगडित आहे. त्यामुळे याचा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो. 
  • - पंचायत समिती निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निगडित असल्याने भाजपाकडून मांडलेले मुद्दे हे विधानसभेचे आहेत, त्यामुळे स्थानिक प्रश्न या निवडणुकीत बाजूला राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित ठेवून त्यांना गृहीत धरणे हे भाजपला अडचणीचे ठरू शकते. 
  • - या गटात चोखामेळा नगर गणातील आघाडीचे उमेदवार संगीता लेंडवे यांचा एनवेळी व्यवहारी पाठिंबा घेऊन भाजप मजबूत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो प्रयत्न या गणातील मतदारांना आवडलेला नाही. त्यामुळे साहजिकच पंचायत समिती गणाचा रोष हा जिल्हा परिषदेमध्ये निघू शकतो, याचा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो. 
  • - या जिल्हा परिषद गटात यापूर्वी आमदार समाधान आवताडे गटाचे तिन्ही सदस्य होते त्यामध्ये मंजुळा कोळेकर या सदस्य होत्या तर अन्य दोन पंचायत समिती सदस्य सध्या अपेक्षित सक्रिय दिसत नाहीत, त्यामुळे त्यांच्या मागील पाच वर्षाच्या कामाचे मूल्यमापन समोर येत आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो
  • - या गटामध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रचाराचा मुद्दा केला असला तरी प्रत्यक्षात या योजनेचे उद्घाटन हे विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आले मात्र, त्याला पर्यावरणाची मंजुरी उद्घाटनानंतर एक वर्षांनी मिळाली आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वी केलेला उद्घाटनाचा कार्यक्रम हा या मतदारांना आवडलेला नाही.
  • - सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या संततदार व अतिवृष्टीच्या पावसामध्ये या मंडलमधील शेतकऱ्यांना वगळले होते नंतर त्यातील काही निवडक (जवळच्या) शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. बहुतांश शेतकरी यापासून वंचित राहिले त्यामुळे पीक नुकसानीचा मुद्दा हा दरवर्षी चर्चेत येतो. परंतु, त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत.
  • - या निवडणुकीत तिर्थक्षेत्र आघाडी कडून उपस्थित केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रश्नातील घरकुलाला वाळू उपलब्ध न करणे, भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध न करणे व 50 हजार वाढीव अनुदानाचा मुद्दा भगीरथ भालके यांच्याकडून प्रभावीपणे मांडला परंतु सत्ताधाऱ्याकडून याबाबतचा अपेक्षित योग्य स्पष्टीकरण दिले नाही. 
  • - या गटात पिण्याच्या पाण्यासाठी असलेली आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर शासनाने कोट्यवधी रुपयाचा खर्च केला. मात्र प्रत्यक्षात या योजनेचा लाभ या भागातील जनतेला झाला नाही. पुढील महिन्यात पाणीटंचाई जाणवणार आहे, त्या पार्श्वभूमीवर या योजनेतील योजनेवर न बोलता अद्याप सुरू न झालेल्या मंगळवेढा या उपसा सिंचन योजनेवर अधिक बोलल्यामुळे हा ही मुद्दा या निवडणुकीत अधिक प्रभावी ठरणार आहे.