#

Advertisement

Saturday, February 21, 2026, February 21, 2026 WIB
Last Updated 2026-02-21T17:22:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रोहित पवार यांना झेड प्लस सुरक्षा द्या

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटनकडूनही मागणी 

मंगळवेढा : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. अजित पवार यांच्या याच विमान अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. विशेषत: या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी काही मुद्दे पुढे मांडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी,  अशी मागणी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघटनेच्यावतीनेही सदर मागणी करण्यात आली असून जिल्हाधिकारी तसेच  पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपप्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताइ साळुंंखे-ढोबळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबत रोहित पवारांनी घातपाताची शक्यता व्यक्त केल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक मुद्दे मांडले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते मंडळींकडून रोहित पवार यांच्या वक्तव्याबद्दल विविध प्रतिक्रया व्यक्त होत आहेत, तर काहिंनी त्यांच्या जीवितास धोका असल्याचे म्हटले आहे, यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपप्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंंखे-ढोबळे यांनी म्हंटले आहे.