#

Advertisement

Saturday, February 21, 2026, February 21, 2026 WIB
Last Updated 2026-02-21T12:33:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

संत दामाजी पुतळ्याची माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली स्वच्छता

Advertisement

मंगळवेढ्यातील नागरिकांकडून अभिनव उपक्रमाचे स्वागत 

मंगळवेढा : महाराष्ट्र राज्याचे माजी स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मंगळवेढ्यात वारी परिवाराचे सतीश दत्तू दत्तात्रय भोसले आदी तरुणांसह दामाजी चौकातील संत दामाजी पंतांच्या पुतळ्याची स्वच्छता केली. पुतळा व पुतळ्यालगतचा भाग स्वच्छ करीत महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश पुढील काळात कायम राहिला पाहिजे, मंगळवेढा शहराला स्वच्छतेची सवय लागली पाहिजे, यासाठी ढोबळे गुरुजींनी अनेक तरुणांना बरोबर घेत स्वच्छतेची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.
पंढरपूरमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांनी भीमा नदीमध्ये चंद्रभागेमध्ये स्वच्छता अभियान नुकतेच राबवले. तर, मंगळवेढा मध्ये नगराध्यक्ष सुनंदा उर्फ आबीताई अवताडे यांनी शहरातील सर्व नगरसेवक, नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील तरुण मंडळे, व्यापारी वर्ग या सर्वांना बरोबर घेऊन मंगळवेढा येथे स्वच्छता महाअभियान राबवण्याची गरज  असल्याचे म्हटले आहे, या पार्श्वभूवर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी संत दामाजी पुतवळ्याची स्वच्छता म्हणजे या अभियानाचे पहिले पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, शहरात असलेल्या नाममात्र मुतारीच्या कडेला व मुतारी मध्ये दारूच्या बाटल्या टाकल्या जातात. या दारुड्यांची सोय करण्यासाठी प्रत्येक मुतारीच्या बाहेर बॅरल ठेवल्यास दारूच्या बाटल्या मुतारीमध्ये पडण्याचे प्रमाण कमी होईल, पर्यायीने त्या ठिकाणी स्वच्छता राहील.
शहरामध्ये चौकामध्ये शासकीय कार्यालयामध्ये आठवडा बाजार परिसरात पुरुष व महिलांसाठी नवीन अत्याधुनिक सुसज्ज अशा सुलभ शौचालयाची गरज आहे. नगरपालिकेने तुर्त आपल्या व्यापार संकुलामध्ये असलेली शौचालय पूर्ववत करण्याची गरज आहे.
महात्मा गांधी गाडगेबाबा पुन्हा जन्माला येण्याची नव्या पिढीसाठी गरज आहे, अशी अपेक्षा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी स्वच्छते मोहिमेत सहभागी होत व्यक्त केली आहे. मंगळवेढ्यात राजकीय क्रांती बरोबर स्वच्छतेची क्रांती घडवण्यासाठी हा एक प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. हा स्तुत्य उपक्रम मंगळवेढेकरांना अधिक भावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.