#

Advertisement

Friday, February 27, 2026, February 27, 2026 WIB
Last Updated 2026-02-27T14:32:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रोहित पवारांचा 'चार' नेत्यांना सज्जड इशारा

Advertisement

सुनेत्रा काकींसोबत वागताना सांभाळून वागा 

मुंबई : पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा काकी आहेत, उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा काकी आहेत. त्यामुळं सुनेत्रा काकींसोबत वागताना सांभाळून, कारण महाराष्ट्र बघतोय. महिलांचा आदर ठेवणं महत्त्वाचं असून दादांची वचक काय होती हे लक्षात ठेवा. या चार नेत्यांवरही दादांचा वचक होता. कालच्या कार्यक्रमात जयला जागा कुठे द्यायची हे, नेते ठरवतात. कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणतरी ओढतं....हे महाराष्ट्राची जनता बघतेय. सुनेत्रा काकी सक्षम महिला पवार कुटुंबाच्या घटक आहेत आणि मोठ्या नेत्या आहेत. त्या चांगलं काम करतील हा आमचा विश्वास आहे, पण, तुम्ही जरा सांभाळून वागा', असा सज्जड इशारा आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांना दिला आहे.
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर आम्ही सगळे दु:खात होतो असं म्हणत अपघातानंतर राज्यात दुस-या दिवशी कुठेही अडचण होऊ नये, दंगल उसळू नये म्हणून शरद पवारांनी घातपात नसल्याचं स्टेटमेंट दिलं होतं. त्यांना वाचावं लागलं इतके ते भावनिक होते असं सांगत गेल्या काही दिवसांमध्ये विलीनीकरण हा शब्द आपण जास्त वापरला की त्यांनी? असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला. अजित पवारल पक्षातील 'चार' लोकांनी विलीनीकरणाच्या विषयाला जिवंत ठेवलं कारण, त्यांचं महत्त्वं दिसत नाही असं म्हणत नाव न घेता काही मोठ्या नेत्यांकडेच रोहित पवारांच्या बोलण्याचा रोख दिसून आला.