#

Advertisement

Monday, February 23, 2026, February 23, 2026 WIB
Last Updated 2026-02-23T14:18:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले...

Advertisement

काकींना सर्व मदत करु, पण तुमच्यासाठी लढा सुरुच राहील 

मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे भावूक झाल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आपल्या शर्टचं वरचं बटण उघडं असायचं, त्यावर ते बटण लावत जा असं अजित पवार म्हणायचे. पण चाळीस-पन्नास वर्षानंतर कधी दादांची वरती भेट होईल त्यावेळी आपण त्यांच्यासमोर हे बटण लावू. तोपर्यंत हे बटण तसंच खुलं असेल, त्यामुळे दादांची रोज आठवण येईल असं रोहित पवार म्हणाले. तसेच अजितदादांच्या अपघाताला जो कुणी दोषी असेल त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडणार नाही असंही रोहित पवार म्हणाले. 
आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी रोहित पवारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 
रोहित पवार म्हणाले की, एकदा अजितदादा मला म्हणाले होते की, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, त्या कमी कर. दादा गेले त्या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी केस कापले. अजितदादा नेहमी मला म्हणायचे की, तुझं शारिरीक वजन वाढलंय. शारिरीक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव. मी त्यावर फक्त हो म्हणायचो. मी अजितदादांना शब्द देतो. माझी हेअरस्टाईल अशीच ठेवेन. शारिरीक वजन कमी करेन, राजकीय वजन वाढवेन.