#

Advertisement

Monday, February 23, 2026, February 23, 2026 WIB
Last Updated 2026-02-23T18:10:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

दादा एकटे गेले नाहीत, आमचा रुबाब आणि माज घेऊन गेले !

Advertisement

 आदिती तटकरे ओक्साबोक्शी रडल्या 

मुंबई : अजितदादांना जाऊन महिना होत आला, आम्हाला सर्वांना कुठेतरी वाटायचं ते आमच्यामध्ये असतील, असं वाटायचं पण तो भ्रम आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर तुटला, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं. कारण या सभागृहावर त्यांचं प्रचंड प्रेम, आज सभागृहात ज्यावेळे त्या खुर्चीवर त्यांना बघितलं नाही, त्यावेळेला ही वस्तूस्थिती मान्य करुन या नेत्याशिवाय आयुष्य जगावं लागेल, हे दुर्दैवानं आज बोलावं लागतंय, असं आदिती तटकरे म्हणाल्या. यावेळी त्यांना रडू आवरलं नाही. 
अजित पवार यांच्याबद्दल बोलताना आदिती तटकरे यांना अश्रू अनावर झाले. 35-40 वर्ष त्यांनी संगळ्यांनी दादांसोबत काम केलं.  अजितदादांना भेटले त्यावेळी माझं वय 12 वर्ष होतं. 2012 साली राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेची स्थापना अजितदादा आणि सुप्रिया ताईंच्या मार्गदर्शनाखाली झाली. अजित दादांचा जनता दरबार पावणे सात वाजता सुरु व्हायचा. राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेचं पद मिळालं त्याचं नियुक्तीपत्र सकाळी 7.10 वाजता त्यांच्या हस्ते मी स्वीकारलं. तेव्हापासून मी त्याच्या सोबत काम करते, असं आदिती तटकरे म्हणाल्या. 2019 ला मी विधानसभेत आले तेव्हा, या सभागृहात कामकाज कसं करावं हे मी दादांकडून शिकले. बजेट, पुरवणी मागण्यांवर कसं बोलावं, बाब क्रमांक, पान क्रमांक याचा उल्लेख कसा करायचा हे अजितदादांनी सांगितलं. व्यक्ती गमावण्याचं दु:ख मोठं असतं. त्याच्या पेक्षा अधिक दु:ख मोठं असते ती व्यक्ती पाहायला मिळणार नाही, त्यांचा आवाज कधी ऐकायला येणार नाही, ही भावना मनाला दु:ख आणि वेदना देणारी असते, असं आदिती तटकरे म्हणाल्या.