#

Advertisement

Sunday, March 22, 2026, March 22, 2026 WIB
Last Updated 2026-03-22T11:35:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"बार्टी" वर पूर्णवेळ महासंचालक कधी नेमणार?

Advertisement

राष्ट्रवादीच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची मागणी 

पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कार्यरत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था  म्हणजेच बार्टी या संस्थेवर अद्यापही महासंचालक पदाची नेमणूक करण्यात आलेली नाही, यामुळे कामकाजावर मर्यादा येत असल्याने बार्टी संस्थेवर पूर्ण वेळ महासंचालक नेमावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपप्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री संजय शिरसाट यांना दिले आहे. 

यबाबत अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले की, समाजातील अनुसूचित जातीतील घटकांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीस बार्टी या संस्थेचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. या संस्थेवर महासंचालक पदावर पूर्ण वेळ अधिकारी नियुक्ती होणे गरजेचे आहे. परंतु, महासंचालक सुनील वारे यांच्या पदाचा कार्यकाळ 8 मार्च 2026 मध्ये पूर्ण झाल्याने प्रभारी म्हणून समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे तात्पुरता अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. परंतु, सदर संस्थेच्या कामाचा भार लक्षात घेता यावर अशा महत्त्वाच्या पदावर पूर्ण वेळ महासंचालक असणे गरजेचे आहे. बार्टी सारख्या संस्थेचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकार्‍यांवर सोपविल्यास हे संस्थेच्या कार्यक्षमतेवरच त्याचा परिणाम होणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास कोर्सेस, विद्यार्थ्यांचे विद्यावेतन व इतर योजनांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नियामक मंडळाच्या बैठका वेळेवर होत नसल्याने धोरणात्मक निर्णयांना उशीर होत आहे. त्यामुळे बार्टी संस्थेवर आयएएस दर्जाच्या अनुभवी व समाजहिताची जाणीव असलेल्या अधिकार्‍याची नियुक्ती करावी, असे अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी म्हटले आहे.